रावेर महाविद्यालयाच्या खेळाडूंचे क्रॉस कंट्रीमध्ये दैदिप्यमान यश*!


रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी अत्यंत गरिबीच्या व प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या रावेर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या जिद्द, मेहनत आणि अथक सरावाच्या जोरावर क्रॉस कंट्री स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार येथे झालेल्या अंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेत श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेरच्या कु. जानवी रोजुदे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे अंतर महाविद्यालयीन स्पर्धेतही जानवीने प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.
या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कु. जानवी रोजुदे हिची कर्नाटक येथे होणाऱ्या अंतर विद्यापीठीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही रावेर महाविद्यालयासह संपूर्ण जळगाव विभागासाठी अभिमानाची बाब आहे.
या उल्लेखनीय यशामागे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे सातत्यपूर्ण नियोजन आहे. क्रीडा समिती डॉ उमेश पाटील सदस्य डॉ. चतुर गाडे, प्रा. लालचंद वळवी तसेच क्रीडा विभागाने खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. हेमंतदादा नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, डॉ संदीप धापसे क्रीडा समिती सदस्य डॉ. चतुर गाडे, प्रा. लालचंद वळवी तसेच क्रीडा विभागाचे डॉ. उमेश नारायण पाटील आणि सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी कु. जानवी रोजुदेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
गरिबी अडथळा ठरली नाही… जिद्द, मेहनत आणि ध्येयाने यश मिळवून दिले!
रावेर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!
कर्नाटकच्या अंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

