Thursday, June 25, 2026
Homeजळगावराष्ट्रीय हिंदू संघटनेचे बैठक संपन्न

राष्ट्रीय हिंदू संघटनेचे बैठक संपन्न

राष्ट्रीय हिंदू संघटनेचे बैठक संपन्न                       भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

दिनांक २५/०६/२०२६ रोजी गुरुवारी दुपारी बारा वाजता राष्ट्रीय हिंदू संघटन संगठन, भुसावळ ची महत्वाची नियोजित बैठक पार पडली.

प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून मंगलाचरण ने सभेस प्रारंभ झाला.

प्रारंभी भुसावळ तालुका अध्यक्ष आदरणीय श्री मुकेश पवार जी यांनी धर्म टिकवण्यासाठी आपल्याला संघटनात्मक कार्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.

सभेस उपस्थित प्रा. सुरेश वाघ, सदस्य, राष्ट्रीय परिषद यांनी राष्ट्रीय हिंदू संगठन कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसून संपूर्ण देशभर स्वयं अस्तित्व असलेली, हिंदू तथा सनातन धर्म टिकवण्यासाठी कार्यरत असलेले संघटना आहे. लव जिहाद बद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की लव जिहाचे मूळ आपण जर शोधले तर आई वडील तथा आपला परिसर. लहानपणापासून बालसंस्कार केले तर लव जिहाद सारखे प्रकरण उद्भवणार नाहीत. तसेच गोमाता ही राष्ट्रमाता म्हणून घोषित करावी त्यासाठी सतत मागणी करत आहे. हिंदुराष्ट्र म्हणून घोषित व्हावे अशा शब्दात त्यांनी वर्णन केले. हिंदू संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .

 

बैठकीला निगराणी समिती अध्यक्ष आदरणीय नागराज महाजन जी, तालुका अध्यक्ष आदरणीय श्री.मुकेश पवार जी, तालुका महिला उपाध्यक्ष महिमा कोलते जी, भुसावळ तालुका संपर्क प्रमुख आदरणीय श्री. सदानंद जोशी जी,आकाश अकॅडमीचे आदरणीय श्री आकाश कनोजे जी, आदरणीय श्री निलेश राजपाल जी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संघटनची प्रार्थनाने समारोप करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या