के. नारखेडे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व संस्था अध्यक्ष डॉक्टर श्री मकरंद नारखेडे साहेब यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न.

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी के. नारखेडे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये संपन्न झालेल्या १०वी व १२वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ हा दि. २५-०६-२०२६ , वार गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. पी. व्ही पाटील साहेब अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी म्हणून. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. श्री. मकरंदभाऊ नारखेडे सपत्नीक उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी श्री. प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापिका ऍडव्होकेट श्रीमती संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. पाठक, संगणक विभाग प्रमुख श्री. बी. ए. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. एस. एल. राणे , श्री. बी. बी जोगी, के. नारखेडे कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य श्री. श्रीवास सर, दिव्य मराठीचे ब्युरोचीफ श्री. हेमंत जोशी, अँड. पी. ई. नेमाडे, जिल्हा बँकेचे यावल तालुका विभागीय उपव्यवस्थापक श्री. पी. एन. राणे , विविध भगिनी संस्थांचे प्रमुख तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संगणक विभाग सहित, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक व विद्यालयातील सर्व विद्यार्थी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती संगीता अडकमोल मॅडम यांनी केले.लोणावळा येथे झालेल्या ‘द कलर सोसायटी मुंबई’ यांच्या तर्फे रंगतंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाची दखल घेत “Fellow of the Colour Society Award 2026” हा पुरस्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. श्री. मकरंदभाऊ नारखेडे यांना देण्यात आला. ही आमच्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे.यानिमित्ताने आमच्या संस्थेच्या विविध शाखांतर्फे तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांतर्फे मा. डॉ. श्री मकरंदभाऊ नारखेडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला संस्थेतर्फे संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. पी. व्ही पाटील यांनी केला. नंतर के. नारखेडे विद्यालयातर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल मॅडम यांनी तसेच के. एन. सी. टी आय तर्फे साहेबांचा सपत्नीक सत्कार श्री. बी. ए. पाटील व सौ. सारिका भारंबे यांनी केला. तर संस्था क्लार्क श्री. प्रमोद तळेले व सौ. वंदना वारके यांनीही मा. डॉ. श्री मकरंदभाऊ नारखेडे यांचा सपत्नीक सत्कार केला. एन. के. नारखेडे कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य श्री. श्रीनिवास सर तसेच एन. के. नारखेडे सी. बी. एस. ई. स्कूल दीपनगर तर्फे सौ. धनश्री भारंबे मॅडम यांनीही साहेबांचा सत्कार केला. तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ऍड. श्री. पी. ई. नेमाडे, श्री. हेमंत जोशी (दिव्य मराठी ब्युरोचिफ) व श्री. प्रभाकर एन. राणे (चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सोसा. डोंगरकठोरा) यांचे तर्फे ही साहेबांचा सत्कार करण्यात आला.यानंतर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी विज्ञान शाखेतून प्रथम वैभवी सोनार, द्वितीय मयुरेश चौधरी, वाणिज्य शाखेतून प्रथम जतीन पाटील, द्वितीय मनन जटाळे, कला शाखेतून प्रथम स्नेहा शेळके व द्वितीय प्रणय महाले, यांना बक्षीस देऊन गौरवांकित करण्यात आले. तद्नंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी मधून प्रथम भाग्यश्री चौधरी व श्रुती चौधरी, द्वितीय लावण्या सूर्यवंशी तसेच प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
.त्याचप्रमाणे नवी दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये सुवर्ण व रजत पदक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावीची विद्यार्थिनी लावण्या सूर्यवंशी हिने मनोगत व्यक्त केले.
प्रमुख अतिथी मा. डॉ. श्री मकरंदभाऊ नारखेडे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन, अभ्यासात…सातत्य ठेवा असा अनमोल संदेश दिला.यानंतर श्री. पी. व्ही. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना सतत अभ्यास करा असा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन राणे, बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादीवाचन सौ. वर्षा कुरकुरे व श्री. एस. डी. वासकर यांनी तर अतिथी परिचय एम. व्ही कुलकर्णी यांनी , ऑलिम्पियाड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यादीवाचन श्री. एस. एस. कापसे यांनी केले तर आभार शाळेचे पर्यवेक्षक श्री. एस . एल. राणे यांनी मानले.
अशा रीतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संगणक विभागा-सहीत सर्वांनी परिश्रम घेतले.

