यावल येथील सूतगिरणीला मोठी आग लागल्याने अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान.

विमा काढलेला असल्यास नुकसान भरपाई मिळणार.?
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल सूतगिरणीच्या गोदामाला आग लागल्यामुळे अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
असला तरी याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना सुत गिरणीचा विमा काढलेला असल्याच् मालकाला नुकसान भरपाई मिळू शकते अशी सुद्धा चर्चा आहे.
यावल नगरपरिषद अग्निशामक बंब तसेच सावदा येथील अग्निशामक बंब यांनी आग आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्न केले.स्थानिक नागरिकांनी तात्काळ येऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
सूतगिरणी मध्ये सौर ऊर्जा प्लेट बसवण्याचे काम सुरू असताना वेल्डिंग करीत असताना उडालेल्या ठीणगी पडल्याने. सदरची आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे,कापूस गाठी तसेच मशिनरीचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे यात सर्व साहित्य कापूस गाठी वगैरे धरून एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मशिनरी तपासणी महसुल विभाग करीत आहेत,या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने सहकार्य करीत होते.यावल तहसील कार्यालयाकडून घटनास्थळावर तलाठी पवन कुमार नवगाळे सूतगिरणीचे मालक डॉक्टर खाचणे यांच्या पत्नी सोनम शैलेशा खाचणे यांच्यासह शहरातील नगरसेवक उमेश फेगडे,राजू वाणी यावल नगरपालिकेचे अधिकारी कोल्हे यांचे सह अनेकांनी भेटी दिल्या.आगीचा पंचनामा करण्यात आला आहे. सूतगिरणीचे कामकाज सुरू आहे आज आग लागल्यामुळे तूर्तास बंद आहे.
सौर ऊर्जा प्लेट बसवितांना वेल्डिंग करणाऱ्यांना वेल्डिंगमुळे सूतगिरणीत असलेल्या कापसाच्या गाठीला / साहित्याला आग लागू शकते याची कल्पना नव्हती का.? सुत गिरणीच्या मालकाने अप्रिय घटना घडल्यास नुकसान भरपाई मिळेल म्हणून सुतगिरणी मशिनरी आणि कापूस, कापूस गाठी व इतर काही साहित्याचा विमा काढलेला असल्यास तसेच विमा काढताना संपूर्ण अटी शर्तीची पूर्तता केलेली आहे किंवा नाही त्यानुसार नुकसान भरपाई मिळणार किंवा नाही याबाबत यावल तालुक्यात चर्चा आहे.

