Monday, June 29, 2026
Homeजळगावदोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिर व पाचवी जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न .

दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिर व पाचवी जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न .

दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिर व पाचवी जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न .

भुसावळ,   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           संतोषी माता बहुउद्देशीय हॉल मध्ये भुसावळ स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून बापू हसबन सर व प्रणव हसबन यांनी जपान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया जळगाव जिल्हास्तरीय शाखेच्या माध्यमातून दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. हे शिबिर दि.26,27 जून 2026 असे दोन पूर्ण दिवस प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई येथून शेट्टी सर व अमर सर यांनी हजेरी लावली असून त्यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना जपान कराटे मार्शल आर्ट या खेळा संदर्भातील बारकावे समजावून सांगत या खेळाचे वैशिष्ट्य व वेळेचे नियम व नियोजन तसेच समय सूचकता या संदर्भात मार्गदर्शन केले.खेळताना शरीराची लवचिकता आणि समय सूचकता हे अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वरक्षणासाठी खेळणे अत्यंत गरजेचे आहे तसेच पालकांनी आपल्या मुलांना या खेळामध्ये सहभागी करून त्यांचा उत्साह वाढवित शारीरिक व मानसिक क्षमता वाढवावी असे आव्हान केले.

पाचवी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मुख्य पंच म्हणून अमर यादव यांनी काम केले. मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष वरुण इंगळे यांनी सभेचे अध्यक्ष स्थान भूषविले. शिवकालीन युद्धकलेचे महत्व विषद केले. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदके देण्यात आली. प्रशिक्षणाथी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी सुद्धा या प्रशिक्षण शिबिर व स्पर्धेत सहकार्य करीत प्रशिक्षणाचा आनंद घेतला . गणेश काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या