संजीवनी ब्लड ग्रुप,भुसावळ या गृपला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ पुरस्कार

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील सामाजिक क्षेत्रात रक्तदान व रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संजीवनी ब्लड ग्रुप, भुसावळ यांना मुंबई (मालाड) येथे अरिहंताणं रक्तसार्थी संस्था, राजस्थान यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .

हा सन्मान संजीवनी ब्लड ग्रुपच्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ रुग्णसेवा व रक्तदान कार्याची पावती आहे. आजपर्यंत हजारो रक्तदात्यांना एकत्र आणून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचे कार्य गृपमार्फत सातत्याने केले जात आहे. रक्तदात हेच जीवन दान या तत्वावर ही रक्तपेढी कार्य करित आहे .
या यशाबद्दल सर्व रक्तदाते, हितचिंतक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने रक्तपेढी संचालक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

