Saturday, September 19, 2026
Homeजळगावनाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांची पाल पर्यटन स्थळाला भेट.

नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांची पाल पर्यटन स्थळाला भेट.

नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांची पाल पर्यटन स्थळाला भेट.

ग्रामीण रुग्णालय व सातपुडा जंगल सफारीची पाहणी

पाल रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                      पाल (ता. रावेर), दि.4/7/2026

नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी पाल येथील सातपुडा जंगल सफारी परिसराला भेट देत वृक्षारोपण करून ‘हरित महाराष्ट्र’ अभियानाचा जळगाव जिल्ह्यात शुभारंभ केला. यावेळी त्यांनी सातपुडा जंगल सफारीचा अनुभव घेत पर्यटन, पर्यावरण संवर्धन आणि वनविभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.

 

सकाळी जंगल सफारीच्या पार्किंग परिसरात विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच त्यांनी निसर्गरम्य वन उद्यान, अनुपमा विश्रामगृह तसेच सातपुडा जंगल सफारीची पाहणी करून पर्यटन सुविधा, वन व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

यानंतर डॉ. गेडाम यांनी पाल ग्रामीण रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी पाल परिसरासाठी तातडीने १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीची सकारात्मक दखल घेत ग्रामीण रुग्णालयासाठी लवकरात लवकर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपवनसंरक्षक सौरीश सहाय, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, तहसीलदार दीपा जेधे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) शीतल नगराळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रावेर) श्रीकांत काळे, वनपाल प्रविण पाटील, संभाजी सूर्यवंशी, अरुणा ढेपले, तसेच वनरक्षक सुपडू सपकाळे, राजू बोंडल, आकाश बारेला यांच्यासह वन, महसूल व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

या भेटीमुळे पाल येथील सातपुडा जंगल सफारीच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश देण्यात आला.

 

*छायाचित्र – पाल ता रावेर जंगल सफारी पार्किंग परिसरात वृक्षारोपण करतांना नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम सोबत जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपवन संरक्षक सौरीश सहाय, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव शितल नगराळे , वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर श्रीकांत काळे आदी.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या