जळगावच्या प्रसिद्ध ‘जागृत नवसाचा गणपती मंदिरात’ संकष्टी चतुर्थीनिमित्त उत्साहात भजनाचा कार्यक्रम संपन्न. जळगाव/ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील बजरंग बोगद्याजवळील प्रसिद्ध ‘जागृत नवसाचा गणपती मंदिर’ येथे ३ जुलै, शुक्रवार रोजी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वावर विशेष भजन कार्यक्रमाचे भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी ७:१५ ते रात्री ९:०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित भाविकांनी बाप्पाच्या चरणी भक्तीभावाने लीन होऊन स्वरवंदना अर्पण केली. विशेष निमंत्रित गायिका वृंदा पाखले,कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे,गुलाब कापडणे,प्रवीण पाटील,विनायक काळे,संयूक्ता बयाणी यांनी भक्तिगीते सादर

<img class

केलीत.अनेक गणेश भक्त व रहिवाशांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. संगीतमय भजनांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.भजनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला. बाप्पाच्या जयघोषाने आणि भक्तीच्या रंगात रंगलेल्या या सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.नवसाचा गणपती मंदिराचे श्री.व्ही.झेड.( बापू ) पाटील ,साहित्यिक ज्ञानेश मोरे ,महाराष्ट्र मंदिर महासंघाचे हितेंद्र धांडे यांचे अनमोल सहकार्य लाभले.त्यांनी कलावंतांचा श्रीफळ देऊन सन्मान केला.

प्रसिद्ध भजनी मंडळ “भक्तीनाद ” ग्रुपने एकापेक्षा एक सरस भजने आणि अभंग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
“गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात आणि टाळ्यांच्या कडकडाटात संपूर्ण भजन संध्या रंगतदार झाली. या सोहळ्यात अबालवृद्धांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.हलकासा पाऊस बरसत होता तरीही भाविकांमध्ये उत्साह दांडगा होता. भजनाच्या तालावर अनेक भाविक तल्लीन झाले. एकूणच,
सुरांच्या आणि भक्तीच्या या अनोख्या संगमात उपस्थित सर्व भाविक जन भक्तिरसात न्हाऊन निघाले.

