चितोडे वाणी समाज नूतन कार्यकारिणी निवड संपन्न . अध्यक्ष पदी नरेंद्र दशरथ वाणी व उपाध्यक्षपदी संजय वसंत सराफ
.
वरणगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथिल ७ जुलै १९५३ रोजी स्थापन झालेल्या चितोडे वाणी समाज संस्थेला ७ जुलै २६ रोजी ७३ वर्ष पूर्ण झाले . संस्थेच्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी सर्वसंमतीने पुढील प्रमाणे नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे . त्यामधे अध्यक्ष पदी नरेंद्र दशरथ वाणी व उपाध्यक्षपदी संजय वसंत सराफ यांची तर कार्याध्यक्ष: राहुल अनिल श्रावगे,सेक्रेटरी: महेश दत्तराज गोडबोले,सह सेक्रेटरी: सचिन प्रकाश सराफ, आणि सदस्य पदी मनोज पंडित वाणी, योगेश जितेंद्र वाणी तर महिला सदस्य पदी ज्योती महेश गोडबोले, ममता मनोज वाणी, सुरेखा जीवन सराफ, ललिता संदीप अकोले. यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . यावेळी अनंत गडे यांचे सहमहिला व युवक मंडळाचे मोलाचे योगदान लाभले. मंडळामार्फत समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात .विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, शासनाच्या नियमांनुसार या संस्थेला ‘दर्पण आयडी’ देखील प्राप्त झाला असून, संस्था कायदेशीर व पारदर्शक कारभारात अग्रेसर आहे.

<img class


