आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

<img class

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.६
सध्या मध्य प्रदेशात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने
तापी नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरण आणि शेळगाव बॅरेज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिले जात आहे पाण्याचा अपव्य होऊ नये म्हणून
त्यातील काही प्रमाणात पाणी हतनुर कालव्यातून सोडण्याचा निर्णय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी घेतल्याने रावेर,यावल,चोपडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
हतनुर धरणातील पाणी वाया जात असल्यामुळे या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात करता येईल या उद्देशानेते पाणी हतनूर धरण कालव्यातून सोडण्याबाबत चोपडा- यावल विधानसभेचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या पत्राची दखल तापी पाटबंधारे महामंडळ तथा जळगाव पाटबंधारे विभागाने घेतल्यामुळे रावेर यावल चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना या कालव्यातील पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

