नगरसेवक राज विजय चौधरी यांचे प्रभाग २० साठी विविध विकासकामांची मागणी;
नाले, रस्ते, लाईट आणि सुरक्षा यावर भर

<img class

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
नगरसेवक श्री राज विजय चौधरी (वार्ड क्र. २०) यांनी दिनांक 30/06/26 रोजी नगरपालिकेला निवेदन देऊन त्यांच्या प्रभागातील विविध सार्वजनिक कामे मंजूर करून तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात रस्ता, नाली, प्रकाशयोजना, सुरक्षा आणि स्वच्छता यांसह एकून २१ घटकांत बदल व सुधारणा करण्यासंदर्भातील प्रस्ताव समाविष्ट आहेत.
निवेदनातील प्रमुख कामांमध्ये
शर्मा हॉस्पिटल जवळ ‘माता स्माई’ यांचे भव्य गेट उभारण्याची मागणी.,
हॉटेल अनिलपासून संतोषी माता मंदिर परिसरापर्यंत आणि विमुक्ती झेरॉक्सपासून भवानीपेठ मंदिर ते माहुरकर बुक डेपोपर्यंत रस्ता कॉकीटीकरण करण्याचे प्रस्ताव.
अष्टभुजादेवी मंदिरासमोरून गब्बर पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉकीटीकरण.
पंचशिल नगरमधील वर्धित विहाराचे दुमजलीकरण व मच्छीमार्केटला गेट उभारण्याचा प्रस्ताव.
गंगाराम प्लॉट ते पंचशिल नगर जोडणाऱ्या पादचारी पूलाचे नुतनीकरण.
गंगाराम प्लॉट, गौतम नगर व पंचशिल नगर परिसरात शॉ कॉर्ड लाईट्स व सार्वजनिक दिवे बसविण्याचे काम.
संपूर्ण प्रभागात २० नवीन डस्टविन बसवून स्वच्छता सुधारण्याचे नियोजन.
नमस्कार मंडळ परिसरात नाली दुरुस्ती व सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण.
काही खास गल्ल्यांमध्ये गटारांचे नुतनीकरण व शौचालयांची दुरुस्ती.
विविध ठिकाणी पार्किंग क्लॉक/पॅकस क्लॉक बसविणे व रस्त्यांवर पोल व लाईट लावून सौंदर्यीकरण.
प्रभागातील सार्वजनिक रस्त्यांवर दोन्ही बाजूने वृक्षारोपण व चौफुली भागाचे फाउंटेन व चौक सुशोभित करण्याचे प्रस्ताव.
सर्वप्रभागात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून सुरक्षा वाढविण्याची मागणी.
वार्षिक कार्यक्रमानिमित्त पंचशिल नगर, गौतम नगर व गंगाराम प�

