Thursday, July 9, 2026
Homeजळगावभुसावळ येथून पंढरपूरसाठी सायकल वारीचे प्रस्थान; सुहर्ष फाउंडेशनतर्फे स्वागत व शुभेच्छा!

भुसावळ येथून पंढरपूरसाठी सायकल वारीचे प्रस्थान; सुहर्ष फाउंडेशनतर्फे स्वागत व शुभेच्छा!

भुसावळ येथून पंढरपूरसाठी सायकल वारीचे प्रस्थान; सुहर्ष फाउंडेशनतर्फे स्वागत व शुभेच्छा!

Oplus_131072

<img class

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रविण फालक आणि सहकारी यांचा हरित वारीचा उपक्रम
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य श्री. प्रविण फालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनासाठी भुसावळ येथून भुवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने सायकलने प्रस्थान केले. पर्यावरणपूरक आणि आरोग्याचा संदेश देत विठ्ठलाच्या चरणी जाण्याचा त्यांचा हा संकल्प समाजमनात कौतुकाचा विषय ठरला आहे

हरित वारीच्या या भक्तीमय प्रवासाला भुसावळ येथुन सुरुवात होत असताना, स्थानिक सामाजिक संस्था सुहर्ष फाउंडेशनतर्फे प्राचार्य प्रविण फालक सर व त्यांच्या सर्व सहकारी सायकलस्वारांचे नाहाटा चौफुली येथे स्वागत करण्यात आले. यावेळी सुहर्ष फाउंडेशनच्या वतीने सर्वांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती . तसेच सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी बोलताना सुहर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित बऱ्हाटे म्हणाले की, “आजचा दिवस आमच्या सुहर्ष फाउंडेशनसाठी अत्यंत भाग्याचा आहे. फालक सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करत सायकलद्वारे पंढरपूर वारी करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच प्रेरणादायी आहे. विठू माऊलीच्या चरणी निघालेल्या या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचे भाग्य आहे. त्यांचा हा पर्यावरणपूरक वारीचा प्रवास आनंददायी होवो आणि या वारकऱ्यांना आणि सर्वांना निरामय आयुष्य, सुख-समाधान लाभो ही माऊली मुक्ताई व विठुराया चरणी प्रार्थना करतो.”

या प्रस्थान सोहळ्यावेळी सायकलस्वारांचा उत्साह दांडगा होता. सुहर्ष फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी फालक सर व त्यांच्या टीमला ‘जय हरी विठ्ठल’च्या गजरात पुढील प्रवासासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. परिसरातून प्रथमच सायकल व्दारा पंढरपूर येथे भाविक जात असल्याने नागरीकांतही भक्ती मय वातावरण निर्माण झाले होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या