Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रनाशिकला बहिणीकडे जाण्यासाठी निघालेल्या ३३ वर्षीय पेंटरचा रेल्वे अपघातात मृत्यू !

नाशिकला बहिणीकडे जाण्यासाठी निघालेल्या ३३ वर्षीय पेंटरचा रेल्वे अपघातात मृत्यू !

नाशिकला बहिणीकडे जाण्यासाठी निघालेल्या ३३ वर्षीय पेंटरचा रेल्वे अपघातात मृत्यू !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नाशिक येथे बहिणीकडे जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या तुकारामवाडी येथील ललित भिकन सोनवणे (वय ३३) या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बोरणार गावाजवळ उघडकीस आली. विशेष म्हणजे, मृताजवळ सापडलेल्या फुटलेल्या मोबाईलमधील सीमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित सोनवणे हे पेंटर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. १९ जुलैच्या रात्री ते नाशिक येथे बहिणीकडे जाण्यासाठी रेल्वेने रवाना झाले होते. मात्र, शहरापासून काही अंतरावरील बोरणार गावाजवळ खांबा क्रमांक ३९६/२० ते २२ दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.दुसऱ्या दिवशी सकाळी गँगमन गणेश भंगाळे यांना रेल्वे रुळाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मृताजवळ कोणतेही ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी फुटलेल्या मोबाईलमधील सीमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून त्यातील संपर्क क्रमांकावर फोन केला. त्यानंतर मावसभाऊ उमेश वानखेडे यांनी मृताची ओळख ललित सोनवणे अशी पटवून दिली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या