Wednesday, July 22, 2026
Homeगुन्हाब्रेकिंग - महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ...

ब्रेकिंग – महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ अटक!

ब्रेकिंग – महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ अटक!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – महावितरण कंपनीच्या भुसावळ शहर-१ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील (वय ५४) यांना सोलर सिस्टीमच्या मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (२२ जुलै) सापळा रचून रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी असून, त्यांनी भुसावळ शहरातील दोन ग्राहकांकडे सोलर प्रकल्प उभारले होते. संबंधित कामांसाठी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आले होते. या अर्जांना मंजुरी देऊन रिलीज ऑर्डर काढण्याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होती.मात्र, प्रत्येक प्रकरणासाठी १ हजार रुपये, अशा दोन प्रकरणांसाठी एकूण २ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला. याबाबत त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यावेळी नितीन पाटील यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. तर सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी पथकासह यशस्वी कारवाई पार पाडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या