Friday, September 18, 2026
Homeजळगावकै. प्रशांत दिलीप सोनार (विसपुते) यांच्या जन्मदिनानिमित्त मानव सेवा केंद्रात भोजनदान

कै. प्रशांत दिलीप सोनार (विसपुते) यांच्या जन्मदिनानिमित्त मानव सेवा केंद्रात भोजनदान

कै. प्रशांत दिलीप सोनार (विसपुते) यांच्या जन्मदिनानिमित्त मानव सेवा केंद्रात भोजनदान

रावेर :    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    कै. प्रशांत दिलीप सोनार (विसपुते) यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन म्हणून मानव सेवा केंद्र, चोपडा येथे समाजोपयोगी भोजनदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मानव सेवा केंद्रातील गरजू, निराधार व गरजवंतांना प्रेमाने भोजन देऊन त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

हा उपक्रम मानव सेवा केंद्र, श्री शांती विहार, सरकारी आय.टी.आय. जवळ, शुगर फॅक्टरी रोड, वेले, ता. चोपडा, जि. जळगाव येथे पार पडला. उपस्थितांनी कै. प्रशांत सोनार यांच्या प्रेमळ स्वभाव, सेवाभावी वृत्ती, समाजाप्रती असलेली आत्मीयता आणि माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 

यावेळी उपस्थितांनी सांगितले की, अशा सेवाभावी उपक्रमांमधून कै. प्रशांत सोनार यांच्या सामाजिक विचारांना आणि कार्याला खरी मानवंदना मिळत असून, त्यांच्या स्मृती समाजसेवेच्या माध्यमातून सदैव जिवंत राहतील.

या भोजनदान उपक्रमासाठी एकविरा ज्वेलर चे संचालक श्री. दिलीप चिंधुशेठ सोनार (विसपुते), श्री. भुषण दिलीप सोनार (विसपुते), चि. मित्त प्रशांत सोनार (विसपुते) आणि चि. हर्ष भुषण सोनार (विसपुते) यांच्यासह समस्त सोनार (विसपुते) परिवार, रावेर यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या