Wednesday, July 22, 2026
Homeजळगावस्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे अभिवादन

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे अभिवादन

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे अभिवादन

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : दि. २२ जुलै २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष मा. उमेशभाऊ नेमाडे यांच्या कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी त्यांच्या सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि गोरगरीब, दलित, पीडित, शोषित, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व आदिवासी समाजाच्या न्यायासाठी केलेल्या कार्याचा उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे, जळगाव जिल्हा सरचिटणीस मा. धर्मराजभाऊ तायडे, निलेशभाऊ कोलते, अतुलभाऊ चव्हाण यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या