Friday, July 24, 2026
Homeजळगावयावल तालुक्यातील महिलेचा पंढरपूरवारीत अपघाती निधन.

यावल तालुक्यातील महिलेचा पंढरपूरवारीत अपघाती निधन.

यावल तालुक्यातील महिलेचा पंढरपूरवारीत अपघाती निधन.

यावल दि.२४ ( सुरेश पाटील )
तालुक्यातील सावखेडा सिम येथील पंढरपूरवारी करणाऱ्या भाविक महिलेचा अपघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली.

सावखेडासिम येथील अंजनाबाई रामलाल पाटील वय ६५ ही पंढरपूरवारी करिता बसने गेली होती,ती गाडंगापूर तुळजापूर करून पंढरपूरच्या मार्गे मोहोळ येथे प्रातःकाल विधीसाठी जात असताना महामंडळाच्या एसटी बस क्रमांक एम एच १४ एन इ ७१६० हिने जोरदार धडक मारली त्यात तीचा मृत्यू झाला तत्काळ तेथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.याबाबत माहोळ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.या सदर्भात आमदार अमोल जावळे यांना भाजपा कार्यकर्ते दिनेश पाटील,कमलाकर पाटील यांनी कळविले असतात तात्काळ त्यांनी दखल घेत प्रेताचे शवविच्छेदन करण्याचे सांगितले यावरून प्रेत त्वरित तेथील डॉक्टरांनी ताब्यात दिले आहे. त्यांच्या वर सावखेडा सिम येथे दि. २४ रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे पश्चात पती,दोन मुलं,सुना,नातवंडे,मुली असा परिवार आहे.त्या रामलाल नागो पाटील यांच्या पत्नी होत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या