दहिगाव येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२४ तालुक्यातील दहिगाव येथील पाटील वाड्यातील तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विनोद हिरामण पाटील वय ३८ याने आज शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी ६ वाजेपुर्वी वेळ नक्की माहीत नाही.त्याचे राहते घराचे पाठीमागील विजेच्या खांबाला बागायतदार रुमालाने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, त्यास त्याचा भाऊ प्रमोद हिरामण पाटील याने तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे अशी खबर प्रमोद पाटील याने यावल पोलिसात दिलेवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार व सहकारी करीत आहेत.त्याचे पक्षात आई-वडील, पत्नी,मुलगा, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

