भुसावळमध्ये भव्य तिरंगा रॅलीने साजरा झाला कारगिल विजय दिवस.

नागरिक,विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग;
देशभक्तीचा जल्लोष
भुसावळ: २६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्त भुसावळ शहरात बियाणी एज्युकेशन ग्रुपतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक,विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात बाजारपेठ पोलीस स्टेशन पासून करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे,प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ,बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सचिव डॉ.संगीता बियाणी, उपाध्यक्ष विनोद बियाणी,रोनक बियाणी,आयुषी बियाणी,मनीष बियाणी,नगरसेवक युवराज लोणारी,पिंटू कोठारी,पिंटू ठाकूर, पुरुषोत्तम नारखेडे, रुपेश
देशमुख,सीमा नरवाडे,प्रशांत नरवाडे,प्रीती पाटील, बबलू बऱ्हाटे,परीक्षित बऱ्हाटे,संदीप सुरवाडे तसेच बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. ही रॅली छ. शिवाजी महाराज व्यापारी संकुला पासून काढण्यात आली होती . संपूर्ण शहरात या रॅलीमुळे देशभक्ती मय वातावरण निर्माण झाले होते .
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना मानवंदना दिली. या रॅलीत बियाणी मिलिटरी स्कूलचे ५०० विद्यार्थी सहभागी होते. तर गेल्या दोन वर्षांपासून अशी तिरंगा रॅली काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
रॅलीवर पुष्पांचा वर्षाव
यावेळी ही तिरंगा रॅली साई जीवन मॉल जवळ आली असता नगरसेवक पिंटू कोठारी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तिरंगा रॅलीवर पुष्पांचा वर्षाव केला.

या तिरंगा रॅलीत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ ‘जय हिंद’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देश भक्तीमय झाला होता. बियाणी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ५० फुटाचा विशाल तिरंगा घेऊन शिस्तबद्ध रॅली काढत नागरिकांमध्ये देशप्रेमाचा संदेश पोहोचवला.फुलांचा वर्षाव करित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या विशाल तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. रॅलीस बाजार पेठ पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले..

