Monday, July 27, 2026
Homeआंदोलनए.आ.विकास प्रकल्प कार्यालयात ठेकेदाराने सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला गुंड प्रवृत्तीने शिवीगाळ,धक्काबुक्की केल्याने कर्मचाऱ्यांनी...

ए.आ.विकास प्रकल्प कार्यालयात ठेकेदाराने सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला गुंड प्रवृत्तीने शिवीगाळ,धक्काबुक्की केल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला.

ए.आ.विकास प्रकल्प कार्यालयात ठेकेदाराने सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला गुंड प्रवृत्तीने शिवीगाळ,धक्काबुक्की केल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.२७
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला एका ठेकेदाराकडून धक्काबुक्की करीत शिवीगाळ करण्यात आली.गुन्हा नोंद झाला असला तरी प्रशासनाने या घटनेची नोंद घेण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी संघटित होऊन संतप्त भावना व्यक्त करीत
काम बंद आंदोलनाचा इशारा
इशारा दिला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथील जिल्हास्तरीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात तीन दिवसापूर्वी घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शासकीय मुलांच्या वसतिगृहातील कंत्राटी काम न मिळाल्याच्या कारणावरून दोन जणांनी कार्यालयात येऊन प्रभारी सहायक प्रकल्प अधिकाऱ्याशी वाद घालत त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आणि आश्रम शाळांमध्ये अशी पुन्हा घटना घडू नये म्हणून तसेच शिवीगाळ करणाऱ्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच कार्यवाही होण्यासाठी तसेच कार्यालयाच्या जीवावर आपले घर प्रपंच सुरळीत सुरू असताना त्याची जाणीव न ठेवता आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे या गुंडप्रवृत्ती विरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी प्रशासनाने झालेल्या घटनेची नोंद घेण्यासाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच संघटना यावल तर्फे यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात एकत्र संघटितपणे जमून तीव्र निषेध व्यक्त करीत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला यामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून आणि शासकीय कामकाज शासनाच्या नियमानुसार पार पडणे कामी काय निर्णय घेतात.? याकडे संपूर्ण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या