Tuesday, July 28, 2026
Homeजळगावपंजाब राज्यातील फगवाडा येथे झालेल्या बाॅक्सिंग स्पर्धेत भुसावळच्या ममता कवंरचा डंका

पंजाब राज्यातील फगवाडा येथे झालेल्या बाॅक्सिंग स्पर्धेत भुसावळच्या ममता कवंरचा डंका

पंजाब राज्यातील फगवाडा येथे झालेल्या बाॅक्सिंग स्पर्धेत भुसावळच्या ममता कवंरचा डंका

सुवर्ण पदक पटकावून शहराच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा.

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  (वा) पंजाब राज्यातील फगवाडा येथे १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान झालेल्या राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेत भुसावळ येथील ममता कवंर या खेळाडूने सुवर्णपदक पटकावून भुसावळ शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ममता कवंर हि भुसावळ येथील केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थीनी असुन सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशनची बाॅक्सिंग खेळाडू आहे. या आधी देखील प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ प्रशिक्षक राकेश सपकाळे प्रशिक्षक सुमेध शेजवळ यांच्या नियमित कठोर परिश्रम मेहनत व कौशल्याच्या जोरावर ममता कवंर या खेळाडूने राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक रौप्यपदक व कांस्य पदक पटकावत भुसावळसह जळगाव जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. विजयाचे सर्वश्रेय ममता कवंर हिने आई वडील व प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ प्रशिक्षक राकेश सपकाळे प्रशिक्षक सुमेध शेजवळ केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य डी. स. नंदेश्वर शिक्षिका प्रिया सिंग राजकिरण निकम लीलाधर सिंग कंवर राम जवरे हरतिश लौढे सुरेश वानखेडे यांच्या सह शाळेतील शिक्षकांना दिले आहे. ममता कवंर हिने मिळविलेल्या यशाबद्दल तीच्या वर क्रीडाप्रेमी व सामाजिक संघटना कडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या