Friday, September 18, 2026
Homeजळगावगुरुपौर्णिमा निमित्त पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात पदयात्रेद्वारे हजारो भाविक दाखल

गुरुपौर्णिमा निमित्त पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात पदयात्रेद्वारे हजारो भाविक दाखल

गुरुपौर्णिमा निमित्त पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात पदयात्रेद्वारे हजारो भाविक दाखल

पाल रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              पाल (ता. रावेर), दि. २८ जुलै २०२६ : परमपूज्य लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृंदावन धाम आश्रम, पाल येथे सालाबादप्रमाणे यंदाही दि. २९ जुलै रोजी अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या वतीने तसेच विद्यमान पीठाधीश्वर श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांच्या सान्निध्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

 

Oplus_131072

या महोत्सवानिमित्त दि. २८ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता मध्यप्रदेशातील ओंकारेश्वरजवळील परम पूज्य ब्रह्मलीन संत श्री महादेव चैतन्य बापू (दगडूजी बापू) धाम चारुकेश्वर आश्रमातून श्री वृंदावन धाम, पाल आश्रमापर्यंत सुमारे १५० किलोमीटरची पदयात्रा पूर्ण करून हजारो चैतन्य साधक व भाविक आश्रमात दाखल झाले. तसेच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातुन सुमारे २०० किलोमीटरहून अधिक अंतर पायी पार करत आलेली भव्य दिंडीदेखील पाल येथील आश्रमात पोहोचली.
“जय गुरुदेव”च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात या पदयात्रांचे आश्रम परिसरात उत्साहात स्वागत करण्यात आले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी परमपूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली असून संपूर्ण आश्रम परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे .

 

Oplus_131072

पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या सोयीसाठी मार्गावरील विविध ठिकाणी फराळ, नाश्ता, पिण्याचे पाणी तसेच भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.या पायी दिंडीत पाल आश्रमाहून पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सोबत आबापुरी सरकार धाम चे स्वामी, संत श्री हरिशरणानंद जी महाराज, श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी किमान दहा किलोमीटर पर्यंतचा रस्ता गाठत त्यांचे भव्य स्वागतासाठी आले.स्वयंसेवकांनी भाविकांची सेवा व व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्ट रीत्या पार पाडत असून

 


दि. २९ जुलै रोजी गुरुपूजन, सत्संग, अभिषेक, पादुका पूजन व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या