गुरुपौर्णिमेनिमित्त “भक्तीनाद” भजन संध्या ग्रुपतर्फे कार्यक्रमाचे आयोजन जळगाव / खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्थानिक “भक्तीनाद” भजन संध्या ग्रुपतर्फे ‘भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्वर सोहळा दि.29 जुलै बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता मोहाडी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात होणार आहे.कार्यक्रमाचे कार्यक्रमात गायक गुलाब कापडणे,विनायक रडे, सुभाष मिस्त्री,गायिका वृंदा पालखे,प्रवीण पाटील आदि भक्तीगीतांचे सादरीकरण करतील.या भक्तीगीतांच्या मैफिलीचे बहारदार व अभ्यासपूर्ण निवेदन कलावंत व “भक्तीनाद ” ग्रुपचे संचालक तुषार वाघुळदे हे करणार आहेत. ” गण गण गणात बोते “..

.चा जयघोषात हा मंदिर परिसर निनादणार आहे..भजनापूर्वी सामूहिक गुरुपूजन होईल. गुरु-शिष्यांच्या पवित्र परंपरेचे स्मरण करण्यासाठी आणि भक्तीमय वातावरणाचा आनंद घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी आणि भाविकांनी या भक्तीमय सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भक्तीनाद ग्रुपचे तुषार वाघुळदे आणि संत श्रेष्ठ गजानन महाराज बहुउद्धेशीय ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष अरुण सोनवणे,उपाध्यक्ष ऍड.प्रकाश दप्तरी,सचिव संजय येवले,विश्वस्त प्रकाशश्चंद्र वडनेरे,मधुकर पाटील,हेमंत विसपुते,अतुल मुळे,सुधीर सोनवणे, रवींद्र पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.

