श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी दामोदर राजपूत
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
राजपूत समाजाच्या संघटन, सक्षमीकरण आणि समाजहिताच्या कार्यासाठी कार्यरत असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी दामोदर राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच भालोद येथील शिक्षक श्री भास्कर नामदेव पाटील यांची खान्देश प्रवक्ता या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्या या नियुक्तीमुळे राजपूत समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ही नियुक्ती सनातन रत्न परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने, ॲड. शीला भाभीसा सुखदेवसिंहजी गोगामेडी (राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा), योगेंद्रसिंहजी कट्यार (राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटन महामंत्री), अभयराजसिंहजी गोगामेडी (राष्ट्रीय उपाध्यक्ष) आणि आनंदसिंहजी ठोके (राष्ट्रीय उपाध्यक्ष) महामंत्री सूरज सिहं ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील (राजपूत) यांनी ही नियुक्ती जाहीर केली. दामोदर राजपूत यांच्या विविध समाज कार्यातील केलेल्या कामगिरी मुळे संघटनेने त्यांची प्रदेश उपाध्यक्ष या पदावरून कार्यकारी अध्यक्ष या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे तसेच भास्कर नामदेव पाटील यांची शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तयांच्यावर खान्देश प्रवक्ता ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर मनोगत व्यक्त करताना दामोदर राजपूत व बि एन पाटील सर यांनी सांगितले की, राजपूत समाजाचे संघटन अधिक सक्षम करणे, समाजातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि समाजहितासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्य करणे, हेच आपले प्रमुख ध्येय राहील. तसेच प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसंगी करणी सेनेचे करणी सेनेचे सह प्रवक्ते राजेंदसिह पाटील,प्रदेश सचिव आनंदा पाटील,जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे,जिल्हाध्यक्ष संदीप राणा महिला जिल्हाध्यक्ष सारिकाताई पाटील,जिल्हा उपाध्यक्ष दिवाणसिंग राजपूत,शहर अध्यक्ष गोकुळ राजपूत,जिल्हा सचिव पंकज चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष मीना ताई राजपूत, कविता ताई राजपूत, जयश्री ताई राजपूत, प्रतीक्षा पाटील, लता पाटील आदी करणी सेना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व संगठना अधिक मजबूत करण्याचे आश्वासन दिले

