Sunday, August 2, 2026
Homeगुन्हापश्चिम वनविभागाच्या कारवाईत साग चौपट व दुचाकी सह ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त.

पश्चिम वनविभागाच्या कारवाईत साग चौपट व दुचाकी सह ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त.

यावल पश्चिम वनविभागाच्या कारवाईत साग चौपट व दुचाकी सह ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त.

परंतु नेहमीप्रमाणे आरोपी फरार झाला की केला .?

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     दि.२   तालुक्यातील कोरपावली शिवारात काल दि. १ ऑगस्ट रोजी वनविभागाने केलेल्या कारवाईत सागवान लाकडाच्या चौपटसह दुचाकी असे सुमारे ४२ हजार रूपये किमतीचे साहीत्य जप्त करण्यात आले असले तरी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दबा धरून बसलेले असताना आणि पूर्वकल्पना असताना सुद्धा आरोपी फरार झाला की या फरार करण्यात आला.? याबाबत तालुक्यात यावल पूर्व व पश्चिम वन विभागातील कार्यवाही बाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

यावल पूर्व पश्चिम वन विभागातून दररोज सागवान व आडजात लाकडासह वनसंपत्तीची खुलेआम तस्करी सुरू असल्याने
सागवान व इतर लाकडाच्या कारवाईत कारवाई करीत असल्याचा कांगावा केला जात असून तस्करी करणारे आरोपी वन विभागांना का आढळून येत नाही.? कारवाई करताना मुद्देमाल सापडतो आणि आरोपी फरार होतात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत माहिती अशी की काल रात्री दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी यावल पश्चिम वनक्षेत्राचे वनरक्षकांचे पथक हे हरिपुरा कोरपावली ते यावल रस्त्याच्या कडेला दबा धरून बसले असतांना साग चौपट वाहतुक करतांना एक मोटार सायकल स्वार दिसुन आला,वनविभाग कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला असता आरोपी मुद्देमाल टाकून पसार झाल्याचे समजले.

सदर मुद्देमाल १ मोटार सायकल ४० हजार रुपये किमतीची तसेच २ हजार किमतीचे साग चौपट ०४ घन मीटर ०.०७५ असा एकूण ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त मु.वि.केंद्र यावल येथे पावतीने जमा केला, सदर वन गुन्हा बाबत व.र हरिपुरा यांनी प्रथम गुन्हे अहवाल. क्र.०४-१/०८/
२०२६ चा जारी केला.पुढील तपास सुरू असल्याचे समजले

याबाबत यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता तसेच आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून प्रतिसाद न दिल्याने याबाबतची सविस्तर माहिती मिळाली नाही.

यावल पूर्व व पश्चिम वन क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात अंदाजे १५ ते २० प्रमुख गावांमध्ये ठिकठिकाणी सागवानी लाकडाचे दरवाजे, खिडक्या,खुर्च्या,टेबल,दिवान, सोपासेट इत्यादी साहित्य विक्रीचे गोरख धंदे सुरू आहेत याचबरोबर ठिकठिकाणी सागवानी लाकडाची व इतर लाकडाचे घरगुती साहित्य तयार करून विक्री करणारी काही फर्निचरच्या दुकानांमध्ये अधिकृतरित्या पास घेतलेल्या सागवानी लाकडाचे साहित्य आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात असून जुन्या सागवानी लाकडाच्या पासेस वर नवीन सागवानी लाकडाच्या वस्तू कशा काय विक्री होत आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल पूर्व व पश्चिम वन विभागात नाममात्र कारवाई केली जात असून प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा याबाबतची माहिती दिली जात नसल्याने वस्तुस्थिती काय आहे ते यावल तालुक्यातील नागरिकांना समजून येत नाही. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत समन्वय साधला जात असल्याने सातपुड्यात जंगल मे मंगल सुरू असल्याचे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या