Monday, September 21, 2026
Homeजळगावरेल्वे बोर्डाच्या आदेशाची अंमलबजावणी करा; परवानाधारक सहाय्यकांची वैद्यकीय सुविधांसाठी डीआरएमकडे मागणी

रेल्वे बोर्डाच्या आदेशाची अंमलबजावणी करा; परवानाधारक सहाय्यकांची वैद्यकीय सुविधांसाठी डीआरएमकडे मागणी

रेल्वे बोर्डाच्या आदेशाची अंमलबजावणी करा; परवानाधारक सहाय्यकांची वैद्यकीय सुविधांसाठी डीआरएमकडे मागणी

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील परवानाधारक सहाय्यक नामदेव प्रकाश गायकवाड यांनी रेल्वे बोर्डाच्या विद्यमान आदेशानुसार परवानाधारक सहाय्यकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रेल्वे बोर्डाने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी पत्र क्रमांक 2018/18-1/2/9/Licensed Porters द्वारे परवानाधारक सहाय्यक (पूर्वीचे परवानाधारक हमाल) यांना रेल्वेमार्फत विहित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते.मात्र, सध्या संबंधित कार्यालयाकडून वैद्यकीय सुविधा तसेच आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल होण्याचा लाभ देण्यास नकार दिला जात असून, ही सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.यासंदर्भात रेल्वे बोर्डाने पूर्वीचा आदेश रद्द किंवा त्यामध्ये बदल करणारा कोणताही नवीन आदेश जारी केला असल्यास त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, असा कोणताही नवीन आदेश अस्तित्वात नसल्यास ३ ऑक्टोबर २०१९ च्या रेल्वे बोर्डाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून परवानाधारक सहाय्यकांना वैद्यकीय सुविधा आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयीन उपचाराचा लाभ देण्यात यावा, अशी विनंती नामदेव प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.

या निवेदनावर इतर परवानाधारक सहाय्यकांच्या स्वाक्षऱ्याही असून, रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून परवानाधारक सहाय्यकांना त्यांचे हक्काचे वैद्यकीय लाभ उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या