Tuesday, August 25, 2026
Homeजळगावसातपुडा जंगल सफारी चा वर्धापन दिन साजरा

सातपुडा जंगल सफारी चा वर्धापन दिन साजरा

सातपुडा जंगल सफारी चा वर्धापन दिन साजरा

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

दिनांक २ ऑगस्ट रोजी सातपुडा जंगल सफारी पाल ता रावेरचा वर्धापन दिन पालच्या जंगलात जावून सातपुडा व्हॅली रोटरी क्लब फैजपूर व रामराज्य सेवाभावी संस्था फैजपूर पदाधिकारी व पर्यटकांचे भरगच्च उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब व रामराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष फैजपूर येथील पांडुरंग सराफ होते. याप्रसंगी त्यांनी प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे. नैसर्गिक संपत्ती जपल्यास भावी पिढीला त्याचा निश्चितच फायदा होईल असे मत व्यक्त केले आहे.
याप्रसंगी त्यांचे हस्ते निसर्ग देवीची विधिवत पूजन करून श्रीफळ फोडून व केक अर्पण करून सातपुडा सफारीचा वर्धापन दिन रोटरी क्लब व रामराज्य सेवाभावी संस्था फैजपूर च्या विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सातपुडा जंगल सफारी अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने २०० भारतीय वृक्षाची लागवड या परिसरात करण्यात आली.

 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन प्रा. डॉ. राजेंद्रसिह राजपूत तर आभार वनरक्षक राजू बोंडल यांनी केले. याप्रसंगी सातपुडा जंगल सफारीचे वनरक्षक आकाश बारेला, वनरक्षक रियाज तडवी, रोटरी क्लब अध्यक्ष पांडुरंग सराफ, सचिब श्रीकांत भुयार, कोषाध्यक्ष निलेश चौधरी, रामराज्य संस्था अध्यक्ष संजय सराफ, सचिव राजाभाऊ चौधरी, वनमजूर राजू तडवी, वनमजूर कय्युम तडवी व सफारी गाईड, सफारी ड्रायवर व सफारी साठी येणारे मोठया संख्येने पर्यटक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या