Saturday, August 8, 2026
Homeगुन्हासातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी श्री मनु मातेचा चांदीचा मुकुट...

सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी श्री मनु मातेचा चांदीचा मुकुट आणि इतर चांदीच्या वस्तू मिळून एकूण १ लाख ३५ हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला.

सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी श्री मनु मातेचा चांदीचा मुकुट आणि इतर चांदीच्या वस्तू मिळून एकूण १ लाख ३५ हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.८
संपूर्ण राज्यातील तथा खानदेश
मधील भाविकांचे,नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या यावल तालुक्यातील सातपुडा निवासीनी श्री कुळदेवी मनुदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी ७ ऑगस्ट २०२६ चे रात्री मंदिराचे दरवाज्याचा कडी कोंडा तोडून अंदाजे १ लाख ३५ हजार रुपयाचा सोने चांदीचा ऐवज, मनू मार्केटचा चांदीचा मुकुट व इतर वस्तू चोरून नेला याबाबत फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,शिवाजी प्रभाकर पाटील, वय ५१ वर्षे, व्यवसाय शेती, रा. आडगाव ता.यावल जि.जळगाव
यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की मनुदेवी माता मंदिर ट्रस्ट येथे उपाध्यक्ष म्हणुन
मंदिराचे काम पाहतो. शुक्रवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी मनुदेवी माता मंदिराचे सायंकाळी भाविक निघुन गेल्यानंतर सायंकाळी ५:३० वा. मंदिराचे गाभा-याचे दरवाजे व मेन गेट बंद करुन देतो व रात्रपाहणी साठी सखाराम बारेला हा सिक्युरीटी म्हणुन ड्युटीस असतो. दिनांक 06/08/2026 रोजी सांयकाळी 05.30 वा. सुमारास नेहमी प्रमाणे मंदिराचे व मनुदेवी माता मंदिराचे
कर्मचारी सुनिल पंडीत पाटील, सुनिल हिम्मत पाटील व विठ्ठल देविदास पाटील तसेच सिक्युरीटी सखाराम बारेला
अशांनी मंदिराचा गाभारा व मंदिराचे मेन गेट बंद केले व तेथे रात्रपाळी पाहणी करीता सिक्युरीटी सखाराम बारेला हा
तेथेच होता.नंतर आम्ही सर्वजण घरी निघुन गेलो.दि.७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सिक्युरीटी सखाराम बारेला याचा मला फोन आला, की मनुदेवी माता मंदिराचे मेन चायनल गेटचे व गाभाराचे
लाकडी दरवाजाचे कडी कोंड्याचे कुलुप तोडलेले दिसत आहे.त्यावरुन मी लागलीच मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष शांताराम
राजाराम पाटील,भाऊसाहेब नारायण पाटील अशांना फोन करुन माहीती दिल्यानंतर आम्ही मनुदेवी माता मंदीर येथे पोहचलो व पाहणी केली असता मंदिराचे मेन चायनल गेटचे कुलुप तोडलेले होते व मंदिराच्या गाभा-याच्या लाकडी दरवाज्याचे कंडी व कोंडा तोडलेला दिसुन आला व गाभा-यात जावुन पाहणी केली तेव्हा गाभा-
यातील मनुदेवी मातेचा मुर्तीवरील चांदीचा मुकुट व चांदीची छत्री व शेजारील रेणुका देवी मातेचा मुर्तीवरील चांदीचा
मुकुट व चौदीची छत्री आम्हाला दिसुन आली नाही.त्यानंतर आम्ही आजुबाजुला शोध घेतला परंतु आम्हाला काही दिसुन आले नाही.त्यानंतर आम्ही यावल पोलीस स्टेशन येथे फोन करुन माहीती दिली. काही वेळा नंतर मंदिरात यावल पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी पाहणी करण्यास आले.त्यानंतर आमची खात्री झाली की कोणीतरी
अज्ञात चोरट्याने वरील मौल्यवान वस्तू ऐवज चोरुन नेले आहे.चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे.
१ ) ४०,५००/- रु. किं. ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा (पांढ-या धातुचा ) मनुदेवी माता मुर्तीवरील मुकुट जु.वा. किं.अ.
२ ) २७.०००- रु. किं. २०० ग्रॅम वजनाची चांदीची (पांढ-या धातुची) मनुदेवी माता मुर्तीवरील छत्री जु.वा.कि.अ.
३ ) ४०.५००- रु. किं. ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा ( पांढ-या धातुचा ) रेणुका माता मुर्तीवरील मुकुट जु.वा. किं.अ.
४ ) २७,०००/- रुपये किंमतीची २०० ग्रॅम वजनाची चांदीची ( पांढ-या धातुची ) रेणुका माता मुर्तीवरील छत्री जु.वा.
किं.अ. असा एकूण – १.३५,०००/- रु. वरील वर्णनाचे जु.वा.किं.अ.तरी गुरुवार दि. ६/८ २०२६ रोजी सांयकाळी ५:३०. वा. सुमारास ते शुक्रवार दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान श्री
मनुदेवी माता मंदीर सातपुडा डोंगरातील ता. यावल येथील मंदीरातील गाभा-यातील सकाळी माता व रेणुका माता मुर्तीवरील मंदिराचे मेन चायनल गेट व मंदिराच्या गाभा-याच्या लाकडी दरवाज्याचे कडी प
कोंडा तोडुन अनाधिकारे मंदिरात प्रवेश करुन माझ्या संमतीवाचून वरील वर्णानाचा एकूण १,३५०००/- रु. किं.ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे.

श्री मनुदेवी माता मंदिरात भक्तगणांना भेदभावाची वागणूक-
सातपुडा निवासिनी श्री मनु माता तथा श्री मनुदेवी मंदिरात संपूर्ण खानदेशासह विविध राज्यातील सर्व स्तरातील भाविक स्री- पुरुष,तरुण मुलं,मुली,ज्येष्ठ स्त्री- पुरुष मोठ्या संख्येने श्री मनुमाता दर्शनासाठी येत असतात यावेळी दर्शन करताना मंदिरातील पुजारी आणि ट्रस्टमधील काही संचालक आपल्या ओळखीच्या आणि जवळच्या भक्तांना भाविकांना सरळ मनुमाता मूर्ती पर्यंत प्रवेश देऊन फोटोसेशन करून चमकोगिरी करीत असतात आणि तसे अनेकवेळा चमकोगिरी चे छायाचित्र व्हाट्सअप फेसबुक माध्यमातून प्रसिद्ध होत असतात.जे ओळखीचे भाविक भक्तगण नाहीत त्यांना रांगेत उभे राहून काही अंतरावर लांबून दर्शन घ्यावे लागते.मंदिरातील काही ट्रस्टी आणि पुजारी असा भेदभाव का करतात..? त्यामुळे रांगेत असलेल्या भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असते याबाबत यावल तालुक्यासह जिल्ह्यात चर्चा सुरू झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या