Saturday, August 8, 2026
Homeजळगावपराग सराफ यांनी तक्रार केल्याने स्मशानभूमी रस्त्याच्या आजूबाजूचे काटेरी झाडे झुडपे काढल्याने...

पराग सराफ यांनी तक्रार केल्याने स्मशानभूमी रस्त्याच्या आजूबाजूचे काटेरी झाडे झुडपे काढल्याने रस्ता मोकळा झाला.

पराग सराफ यांनी तक्रार केल्याने स्मशानभूमी रस्त्याच्या आजूबाजूचे काटेरी झाडे झुडपे काढल्याने रस्ता मोकळा झाला.

यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि. ८
येथील श्री महर्षी व्यास मंदिराजवळील स्मशानभूमी आणि पटेल कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आजूबाजूस काटेरी झाडे झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची तक्रार नगरसेवक पराग सराफ यांनी केल्याने काटेरी झाडे झुडपे तात्काळ काढण्यात आली.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रेत यात्रा जाताना आणि नागरिकांना येताना – जाताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबतची तक्रार नगरपालिकेत भाजपाचे नगरसेवक पराग सराफ यांनी नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील,न.प.मुख्याधिकारी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्याकडे करता बरोबर तक्रारीची दखल घेण्यात आली तसेच नगरसेवक पराग सराफ यांनी स्वतः त्या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून जेसीपी मशनरीच्या साह्याने रस्त्याच्या आजूबाजूचे काटेरी झाडे झुडपे तत्काळ काढली.त्यामुळे यावल शहरात नगरपालिकेच्या कामकाजाविषयी सकारात्मक चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या