Sunday, August 9, 2026
Homeजळगावई-बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करा रिक्षा-टॅक्सी चालकांच्या रोजगार संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;...

ई-बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करा रिक्षा-टॅक्सी चालकांच्या रोजगार संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

ई-बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करा
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या रोजगार संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

जळगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               खासगी तसेच सरकारी अॅपच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ई-बाईक टॅक्सी सेवेला तात्काळ स्थगिती देऊन रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करावे, या मागणीसाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले.प्रदेशाध्यक्ष रियाज सैय्यद यांच्या आदेशानुसार व इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष तनवीर खान यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

ई-बाईक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक ऑटो रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी महासंघाने केली.राज्यातील लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांनी शासनाच्या धोरणावर विश्वास ठेवून कर्ज काढून वाहने खरेदी केली आहेत. या व्यवसायातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अशा परिस्थितीत ई-बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिल्यास रिक्षा व टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होऊन अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चालक संघटनांशी चर्चा न करता अशा प्रकारचे निर्णय घेऊ नयेत, रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करणारे ठोस धोरण जाहीर करावे, तसेच कर्जबाजारी चालकांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

व्यापारी संघटनेचा पाठिंबा
या निवेदनाला जळगाव जिल्हा ऑटो रिक्षा खरेदी-विक्री व्यापारी संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला.
यावेळी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अकरम शेख हुसेन, उपाध्यक्ष सिकंदर इब्राहीम तडवी, शहराध्यक्ष रवींद्र काशिनाथ सोनवणे, शहर उपाध्यक्ष ईश्वर रामसिंग चव्हाण, शहर सचिव मुकेश नारायण चौधरी, कार्यकारी अध्यक्ष संतोष ओंकार अहिरे (मामा), सल्लागार शेख मुनाफ शेख सुलेमान, संघटक हसन बेग गनी बेग, उपसंघटक सुरेश केशव चव्हाण, कार्यकारिणी सदस्य सुभाष सुरेश धोबी व शहर कोषाध्यक्ष इमरान शेख उपस्थित होते.

तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण मुरलीधर दाभाडे, प्रमुख सल्लागार आसिफ अली रशीद अली, शहर उपाध्यक्ष शेख नबी शेख करीम कुरेशी, शहर सचिव मोहम्मद रफिक शेख निजामुद्दीन, शहर सहसचिव तौसिफ मोहम्मद अल्ताफ मोहम्मद, संपर्क प्रमुख मुश्ताक शाह पीरन, उपसंपर्क प्रमुख वसीम अली कलीम अली, शहर संघटक शमशेर खान शब्बीर खान, कार्यकारिणी सदस्य कैलास रामचंद्र साळुंखे व शांताराम तुकाराम बेदरकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या