साकरी येथे महिला सबलीकरणासाठी शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ : महिला सबलीकरणाच्या उद्देशाने निर्मला ट्रेनिंग, साकरी व श्री विद्या बहुउद्देशीय संस्था, वरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. दिशाताई समाधान महाजन या होत्या, तर उद्घाटक म्हणून भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदनाताई पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीयाई म्हस्के (महिला दक्षता, भुसावळ), नंदाताई निकम (महिला शिवसेना जिल्हाध्यक्षा), सविताताई माळी (शिवसेना जिल्हा उपाध्यक्षा), राजेश्री सुरवाडे (संघमित्रा फाऊंडेशन, भुसावळ), स्नेहाताई सोनवणे (अंगणवाडी आशा वर्कर्स कामगार संघटना जिल्हाध्यक्षा), पुनमताई तल्लारे (तापी पूर्णा फाऊंडेशन, भुसावळ), आशाताई तडवी तसेच विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर महिलांनी महिला सबलीकरण, स्वावलंबन आणि कौशल्य विकासाचे महत्त्व विशद करत महिलांना प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेखाताई देशमुख यांनी मानले.

