Tuesday, August 25, 2026
Homeजळगावश्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी घेतली नेपाळ दुर्घटनेतील भाविकांची भेट

श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी घेतली नेपाळ दुर्घटनेतील भाविकांची भेट

श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी घेतली नेपाळ दुर्घटनेतील भाविकांची भेट

मुंबई खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुंबई येथील अपोलो आणि ब्रिज कँडी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेले नेपाळ दुर्घटनेतील जखमी भाविकांची भेट येथील गुरुदेव सेवा आश्रमचे गादीपती श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी घेतली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल येथील भाविकांचा काठमांडू नेपाळ येथे झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या भाविकांना तात्काळ मुंबई येथे आणून त्यांच्यावर मुंबई येथील अपोलो आणि ब्रिज कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे.

या भाविकांची भेट जामनेर येथील श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी घेऊन विचारपूस केली. वेळेवर व योग्य उपचार होत असल्याने जखमी भाविकांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यावेळी येथील रुग्णांची काळजी घेण्यासाठी आ. संजय सावकारे, भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भुसावळचे उद्योगपती मनोज बियाणी आदी उपस्थित होते. या नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या भाविकांना महाराजांनी श्रद्धांजली वाहिली. तर अपघात ग्रस्त भाविकांपर्यंत तात्काळ पोहोचून मदत कार्य, मृत्यू पावलेल्या भाविकांचे अंत्यविधी संस्कार, जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करून वेळेवर उपचार व प्रत्येकाच्या परिवाराला धीर देणे या सर्व प्रक्रियेत प्रामुख्याने ना. गिरीश महाजन यांच्यासह त्यांच्या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराजांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या