Tuesday, August 25, 2026
Homeजळगावआमदार अमोलदादा जावळे यांनी तहसील कार्यालयात सानवी गडेचा गौरव केला.

आमदार अमोलदादा जावळे यांनी तहसील कार्यालयात सानवी गडेचा गौरव केला.

आमदार अमोलदादा जावळे यांनी तहसील कार्यालयात सानवी गडेचा गौरव केला.

यावल दि.१६  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावल तहसील कार्यालयातर्फे यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरातील इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जळगाव जिल्ह्यात ८५ .२३ % गुण मिळवून प्रथम क्रमांक कु. सानवी पंकज गडे हिने मिळविल्याने तिचा सत्कार आमदार अमोलदादा जावळे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून सानवीने जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, बाल संस्कार विद्या मंदिराच्या शैक्षणिक गुणवत्तेचीही दखल घेतली गेली आहे.
या सत्कार समारंभास यावल – रावेर तालुक्याचे विधानसभा आमदार अमोलदादा जावळे , तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण साहेब,गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी,पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे तसेच विविध सामाजिक संघटना व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सानवीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या यशामागे मार्गदर्शन करणारे तिचे आई-वडील, मुख्याध्यापक शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन यांचेही कौतुक करण्यात आले.
सानवीच्या या यशामुळे बाल संस्कार विद्या मंदिर,यावल परिवारात आनंदाचे वातावरण असून,तिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या