Tuesday, August 25, 2026
Homeजळगावजागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी यावल पोलिसांचा सामाजिक बांधिलकीतून चोख पोलिस बंदोबस्त.

जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी यावल पोलिसांचा सामाजिक बांधिलकीतून चोख पोलिस बंदोबस्त.

जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी यावल पोलिसांचा सामाजिक बांधिलकीतून चोख पोलिस बंदोबस्त.

तडवी,भिल्ल उत्सव समितीने पो.नि.रंगनाथ धारबडे याचा सत्कार केला.

यावल दि.१६  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथे नुकताच जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात आदिवासी तडवी, भिल उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले होते सामाजिक बांधिलकीतून पोलिस प्रशासनाचे चोख पोलीस बंदोबस्त ठेवून मिरवणूक,
सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रम सुरळीत पार पडावेत आणि कायदा सुव्यवस्था,जातीय सलोखा अबाधित रहावा,यासाठी पोलिस प्रशासनाने आपला पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी नागरिक,युवक,
महिला तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे कामी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनांची, नागरिकांची गर्दी वाहतूक नियंत्रण,नियोजन आणि सुरक्षिततेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततामय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण
वातावरणात पार पडला.
पोलिस कर्तव्यदक्षता दाखवत आयोजकांसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आदिवासी तडवी,भिल उत्सव समिती यावल तसेच समाजबांधवांच्या वतीने पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांचा सत्कार केला. यावेळी आयोजकांनी पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
“जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडतानाच
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना सकारात्मक
सहकार्य करणारे पोलिस प्रशासन निश्चितच कौतुकास्पद
आहे,”अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.यावेळी आदिवासी तडवी भिल उत्सव समितीचे अध्यक्ष अब्दुल रशीद तडवी,
उपाध्यक्ष सलीम सुभान तडवी,
कार्याध्यक्ष फिरोज अब्बास तडवी, सचिव तुराब उखर्ड तडवी,प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार फिरोज सुभान तडवी,
सांस्कृतिक कार्यक्रम समिती सदस्य रोहित मेहबूब तडवी, युवराज अहमद तडवी,सदस्य सरवर तडवी,खजिनदार शब्बीर तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या