Sunday, August 16, 2026
Homeजळगाववढोदा प्र.यावलं येथे सुरक्षा दलातील सेवानिवृत्त जवानाच्या हस्ते ध्वजारोहण,

वढोदा प्र.यावलं येथे सुरक्षा दलातील सेवानिवृत्त जवानाच्या हस्ते ध्वजारोहण,

वढोदा प्र.यावलं येथे सुरक्षा दलातील सेवानिवृत्त जवानाच्या हस्ते ध्वजारोहण,

यावल दि.१५  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील वडोदे प्र.यावल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैन्य दलात CRPF मेजर पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले महेलखेडी येथील उज्ज्वल महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रभाकर आप्पा सोनवणे जि.प.गटनेते,ग्रामपंचायत वढोदा प्र.यावल यांच्या वतीने सरपंच व यावल तालुका अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र संदीप भैय्या सोनवणे ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सरपंच संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी देश भक्ती गीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आनंद करण्यात आले तरी या ध्वजारोहण प्रसंगी उपसरपंच गोपाळ चौधरी व ग्रामसेविका अश्विनीताई त्रिभुवन व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद गावातील विविध आजी-माजी सरपंच उपसरपंच, सदस्य,पदाधिकारी,विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी,सन्माननीय ग्रामस्थ बंधू – भगिनी या सर्वांनी उपस्थित होते

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या