Sunday, August 16, 2026
Homeजळगावके. नारखेडे विद्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा* - _ध्वजारोहण, शपथ आणि...

के. नारखेडे विद्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा* – _ध्वजारोहण, शपथ आणि देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर देशभक्तीमय_

के. नारखेडे विद्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा* – _ध्वजारोहण, शपथ आणि देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर देशभक्तीमय_

भुसावळ,     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   15 ऑगस्ट 2026* : 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त के. नारखेडे विद्यालयाच्या आवारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री पी. व्ही. पाटील साहेब यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत “वन्दे मातरम्” पासून करण्यात आली. नंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत व राज्य गीत गायले.

यावेळी संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी श्री. प्रमोद नेमाडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस्.ए.अडकमोल मॅडम, उपमुख्याध्यापक श्री एस्. पी. पाठक, पर्यवेक्षक श्री एस्. एल्. राणे व श्री बी.बी. जोगी, संगणक विभाग प्रमुख श्री बी. ए. पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

*उद्देशिका वाचन आणि शपथ घेऊन कार्यक्रमाला सुरुवात* == ध्वजारोहणानंतर उपमुख्याध्यापक एस. पी. पाठक सर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे स्वतः वाचन केले व विद्यार्थ्यांकडून सामूहिक वाचन करवून घेतले. त्यानंतर एम. व्ही. गरुडे सर यांनी सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली, तर एस. पी. महाजन सर यांनी कॉपीमुक्तीची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी देशहितासाठी हे संकल्प पाळण्याचा निर्धार व्यक्त केला.

*सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत*
संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रिया घेटे, वैष्णवी मोगरे, आकांक्षा जाधव यांच्यासह सकाळ शाखेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संगीत शिक्षक श्री. डी. एम्. हेलोडे सर व श्री एम्. व्ही. कुलकर्णी सर तसेच तबलावादक विद्यार्थी सुदीक्षण चौधरी यांच्या सुरेख साथसंगतीने देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच कृष्णा नाले, सुजल जावळे आणि कार्तिक झांबरे यांनी स्वातंत्र्य, कर्तव्य आणि युवा पिढीची जबाबदारी या विषयांवर आपले विचार मांडले.
ध्वजारोहणाचे संचालन श्री एन. पी. नेहेते व श्री एन. ए. नेमाडे सर यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. टी. चौधरी यांनी केले.
राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या