Sunday, August 16, 2026
Homeजळगावजय गणेश फाऊंडेशन च्या नवसाच्या गणपतीचे भूमिपूजन

जय गणेश फाऊंडेशन च्या नवसाच्या गणपतीचे भूमिपूजन

जय गणेश फाऊंडेशन च्या नवसाच्या गणपतीचे भूमिपूजन
भुसावळ-    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          येथील सुरभी नगरातील जय गणेश फाऊंडेशन च्या नवसाचा गणपतीच्या आरास सभामंडपाचे भूमिपूजन फाउंडेशनच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख सुधीर देशपांडे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. नवसाच्या गणपतीचे हे २० वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणेच ह्यावर्षी देखील पुण्याच्या धर्तीवर संपूर्ण १०दिवस लहानथोरांपासून ज्येष्ठ वृद्धांपर्यंत असे विविध सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम घेऊन सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे जय गणेश फाऊंडेशन चे संस्थापक, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी याप्रसंगी सांगितले. मागील १९ -वर्षांची परंपरा कायम ठेवत ह्या वर्षी सुद्धा मूर्ती १८ इंचाचीच राहणार असून विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात होणार आहे.
भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक संतोष चौधरी (दाढी ), नगरसेविका पल्लवी कोलते, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष नारायण वडदकर, युथ क्लब अध्यक्ष हर्षल वानखेडे, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष विशाल आहुजा, कार्याध्यक्ष तुषार झांबरे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, सचिव प्रकाश चौधरी , फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी व परिसरातील बहुसंख्य स्त्री- पुरुष भाविक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या