Sunday, August 16, 2026
Homeजळगाववरणगावातील ३६ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पत्नीची पोलिसांत तक्रार

वरणगावातील ३६ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पत्नीची पोलिसांत तक्रार

वरणगावातील ३६ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पत्नीची पोलिसांत तक्रार

१४ ऑगस्टपासून संपर्क नाही; बोदवडला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले                          भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                वरणगाव, ता भुसावळ :
वरणगाव शहरातील मकरंद नगर परिसरातील राहुल एकनाथ आरोटे (वय ३६) हे १४ ऑगस्ट रोजी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांच्या पत्नी पूजा राहुल आरोटे (वय ३४) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पतीचा शोध घेण्याची विनंती केली आहे.
पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, राहुल आरोटे हे पत्नीसमवेत वरणगाव येथे राहत असून मुक्ताईनगर रोडवरील हॉटेल सहेली हे हॉटेल भाडेतत्त्वावर चालवितात. १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास राहुल यांनी ‘हॉटेलवर जाऊन येतो’ असे पत्नीला सांगून घरातून बाहेर पडले.यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास पत्नीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यावेळी मोटारसायकल चालविण्याचा आवाज ऐकू आला. आपण कुठे जात आहात, अशी विचारणा केली असता राहुल यांनी कामानिमित्त बोदवड येथे जात असल्याचे सांगितले.

दरम्यान, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नीने पुन्हा राहुल यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल स्विच ऑफ असल्याचे आढळले. त्यानंतर वारंवार फोन करूनही संपर्क होऊ शकला नाही. पत्नीने मित्र तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली; मात्र राहुल यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.

बेपत्ता व्यक्तीचे वर्णन —
राहुल एकनाथ आरोटे यांचे वय ३६ वर्षे असून रंग सावळा, केस काळे, नाक सरळ आणि उंची सुमारे ५ फूट ४ इंच आहे. ते बेपत्ता झाले त्यावेळी त्यांनी आकाशी रंगाचा जीन्सचा शर्ट व आकाशी रंगाची जीन्स पँट परिधान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
राहुल यांच्याशी संबंधित मोबाईल क्रमांक 9270376606, 9730377454 आणि 8830264364 असल्याचेही पोलिसांना कळविण्यात आले आहे.
राहुल आरोटे यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने वरणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या