विल्हाळे येथे कपिलेश्वर मंदिराच्या मुकुटाची मिरवणूक संपन्न
हिंदूराजा अघोरी टिमचे उत्कृष्ठ सादरी करण
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथे पुरातन कपिलेश्वर मंदिराचे मुखवट्याची भव्य मिरवणूक संपन्न झाली .
याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे यांनी कपिलेश्वर महादेव पिडींची पुजा व आरती केली .
ग्रामस्थांनी व मंदीर समितीने मुकुटाची डी जे तसेच मंगल वाद्या च्या गजरात भव्य मिरवणूक आयोजन केले होते .
सकाळीच वेल्हाळे गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. गावकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दर्शना साठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या . यात बाहेर गावच्या भाविकांचा सहभाग होता .
हे हेमाडपंथी मंदिर विविध प्रकारच्या स्थापत्य शिल्पासाठी ओळखले जाते. या मंदिरात सीमेंट किंवा चुना न वापरता दगडावर दगड ठेऊन केलेली बांधणी दिसून येते.
सभागृहातील नक्षीकाम केलेली दगडी स्तंभ आणि मंदिरातील कलाकृती विशेष लक्ष वेधून घेतात.
या मंदिरात श्री यंत्रावर स्थापित असलेला पिंड हा या प्रकारचा एकमेव पिंड असल्याचे स्थानिक व श्रद्धाळू प्रकार महाराष्ट्रात देशात कमीच आढळतो. यामुळे या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही वास्तू पूर्वी मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेली होती; पुजारी पंढरीनाथ स्वामी यांनीच प्रथम मंदिराचे जीर्णोद्धार सुरु केले. सध्या गावातील युवक व ग्रामस्थ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एकजूटाने काम करत आहेत आणि मंदिराला तीर्थस्थानाचा दर्जा मिळवून देण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.

याप्रसंगी मंत्री संजय सावकारे यांनी पुरातत्व विभागाकडून मंदीर विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले .
मुकुटयात्रेच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि हिंदुराजा अघोरी पथकाने विविध धार्मिक नाट्यप्रस्तुती चित्त थरारक व संगीतपर कार्यक्रम सादर केले.
ग्रामस्थ व मंदिर समितीच्या प्रयत्नांनी वशिष्ठ पिढ्यांच्या संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेल्हाळ्यातील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारात लोकांनी एकत्र येऊन जे सहकार केले आहे, त्यातून या मंदिराचे भवितव्य उज्ज्वल दिसत आहे.
भुसावळ तालुक्यातील वेल्हाळ्यातील या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाचे संरक्षण व प्रसार करण्यासाठी स्थानिक भावना आणि प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत.

