Tuesday, August 25, 2026
Homeजळगाववरणगाव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेवून संपविले जीवन .(महिन्याभरातील सातवी घटना...

वरणगाव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेवून संपविले जीवन .(महिन्याभरातील सातवी घटना . 

वरणगाव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेवून संपविले जीवन .(महिन्याभरातील सातवी घटना .

वरणगाव :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            परिसरातील फुलगाव ता . भुसावळ येथे किन्नरने स्वतःच्या राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली व त्या पाठोपाठ पिंपळगाव खु ॥ शेती शिवारातील धानोरी रस्त्यावर झाडाला दोरी बांधून गळफास लावून एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे . त्यामुळे महिन्याभरात गळफासाने आत्महत्या करणारांची वरणगाव परिसरातील संख्या आठ झाली आहे.

या बाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील फुलगाव येथील रहिवाशी तानिया ( किन्नर ) उर्फ तुषार अनंत बावस्कर (३१ ) याने दि १६ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळचे सुमारास आईला भुक लागली आहे लवकर पोळ्या बनव, असे सांगुन घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेला .पोळ्या तयार झाल्यावर जेवणासाठी आईने तुषारला हाक मारली असता वरच्या खोलीतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आईने वर जाऊन बघीतले असता तुषार उर्फ तानियाने वरच्या मजल्याच्या खोलीतील छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनल मयताची आई रेखा अनंत बावस्कर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेतेचा तपास पो हे कॉ राठोड हे करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खु ॥ येथे एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षे वयोगटाच्या अनोळखी व्यक्तीने पिंपळगाव शेती शिवारातील धानोरी रस्त्यावर असलेल्या एका झाडाला लाब रूमाल बांधून गळ्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे रानभाज्या वेचण्यासाठी गेलेल्या एका इसमाच्या दृष्टीस पडले .या बाबतसुद्धा वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास गोपीचंद सोनवणे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या