वरणगाव नगर परिषदेच्या सभेत ६८ विषय मंजूर.
मुख्याधिकारी यांच्या अतिरिक्त कारभाराला विरोध .
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथिल नगर परिषदेची मासिक सभा दि .१७ ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत अनेक जनहिताचे विषयाला मजुरी देत आठ महिण्याच्या अंतराने नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी यांना इतर नगर परिषदेचा अतिरिक्त कारभार देऊ नका ? असा ठराव मंजूर करण्यात आला आहे
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला नुतन मुख्याधिकारी राहुल मनोहर भोये , उपनगराध्यक्ष अरुणाबाई इंगळे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. या सभेत ६८ विषयांपैकी ३ / ४ विषयांवर साधक बाधक चर्चा झाली व शेवटी सर्वच्या सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले .
यावेळी प्रामुख्याने शहरातील सर्व प्रभागातील अत्यावश्यक ठिकाणी गटार दुरुस्ती सह धापे व रस्ते दुरुस्ती करणे तसेच ओपन स्पेस मध्ये विविध विकास कामे करणे नमो गार्डन सह रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट उभारणे इत्यादी ठराव मंजुर करण्यात आले . तसेच नुकतेच रुजु झालेले मुख्याधिकारी राहुल भोये यांना जिल्हाधिकारी यांनी भुसावळ चा अतिरिक्त कारभार सोपविण्याबाबतच्या पत्राला सर्व सभागृहातील सदस्यांनी एकमताने विरोध दर्शविला . त्यामुळे वरणगावातील कामे पूर्वीप्रमाणेच खोळंबतील अशी चर्चा झाली .यावेळी शामल झांबरे यांनी शहरातील महिला बचत गटाच्या नोंदणीबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली . शिवसेनेच्या तृप्ता महाजन , माला मेढे ,राजेन्द्र चौधरी , विनोद झोपे,अशपाक शहा, राष्ट्रवादीचे नाना चौधरी इरफान सैय्यद भाजपचे अरूणाबाई इंगळे ,शुभम जावळे,निलेश खाचणे ,मनिषा माळी भाग्यश्री सोनवणे,श्रद्धा गायकवाड ,वंदना पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला . वैशाली धनगर दीपाली माळी शबनमबी मिर्झा , शबाना खाटीक ,वृशाली चौधरी माधुरी हळदे, रविंद्र सोनवणे दीपेश पाटील यांचे सह सर्व नगरसेवक , नगर परिषद अधिकारी व कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्यामुळे नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी सर्वांचे आभार मानले .

