Tuesday, August 18, 2026
Homeजळगावराष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्षपदी हाजी अन्वर...

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्षपदी हाजी अन्वर खाटीक.

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) रावेर लोकसभा जिल्हा
कार्याध्यक्षपदी हाजी अन्वर खाटीक.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    दि.१८
यावल तालुक्यातील फैजपूर येथील हाजी अन्वर हाजी अजगर खाटीक यांचे
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षासाठी दिलेले योगदान तसेच सामाजिक, राजकीय कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षासाठी रावेर लोकसभा जिल्हा
कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत जयवंतराव शिंदे यांनी दिले.

दि.१६ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या पत्रात नमूद केली आहे की पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत
करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास वाटतो. समाजातील सर्व घटकांना
सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हाजी अन्वर खाटीक —
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांच्या जळगाव जिल्हा रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष पदी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांनी दि. १६ ऑगस्ट २०२६ माझी नियुक्ती केली.ही नियुक्ती माझ्यासाठी केवळ पद नसून पक्षसंघटन,पक्षाची भक्कम फळी मजबूत करण्याची,अधिक जोमाने काम करण्याची आणि माझे कर्तृत्व नव्याने पुन्हा एकदा सिद्ध करण्याची नवी संधी आहे. माझ्यावर सोपवलेल्या या जबाबदारी बद्दल मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आमदार रोहित दादा पवार माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब माजी मंत्री अनिल देशमुख साहेब युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख आमदार सुनिल भाऊ भुसारा प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार साहेब यांचे आभार मानतो.

साहेबांचे विश्वासु मित्र माजी खासदार व आमदार इश्वर बाबुजी जैन व माझे मामा भडगाव चे प्रसिद्ध उद्योजक स्व दादासो मुनाफ सेठ यांच्या सहवासात राहून सामाजिक चळवळी कडे खेचला गेलो आणि नंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वयाच्या १६ व्या वर्षीच कार्याला सुरुवात केली. याला आता २० वर्षे होत आली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना इथपर्यंतचा प्रवास करता आला यात अनेकांचा सहभाग आहे. माझे कुटुंब, नातेवाईक, मी राहतो त्या भागातील माझे सवंगडी, विद्यालयीन मित्र,नंतरच्या काळात फैजपुर शहराचा शहराध्यक्ष असताना भेटलेले अनेक सहकारी फैजपुर शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी, नेते आले आणि गेले अनेक वर्षांपासून शहराध्यक्ष पदावर काम करत असताना राज्यभरात भेटलेले अनेक सहकारी आणि पक्षातील अनेक प्रदेश पातळीवरील नेते पदाधिकारी ह्या सगळ्यांनी कायम मला साथ दिली. विषेश खासदार ईश्वर बाबुजी रविंद्र भैय्यासाहेब मा आमदार मनिष दादा जैन या सगळ्यांचा मी ऋणी आहे.

या प्रवासात अनेक राजकीय चढ-उतार आले, मात्र पक्षाच्या विचारांप्रती आणि संघटनेप्रती माझी निष्ठा मी कधीही ढळू दिली नाही. या काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले शहराध्यक्ष पदाच्या काळात आदरणीय जयंत पाटील साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला घडवत महाराष्ट्र समजून घेण्याची आणि संघटनात्मक काम करण्याची संधी दिली.

या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रवास करत असताना विद्यार्थी प्रश्नांसोबतच राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीचा जवळून अभ्यास करता आला. हजारो विद्यार्थी,युवक आणि कार्यकर्त्यांशी संपर्क निर्माण झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या