सुनसगाव येथे घरपोच एच पी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांची नाराजी !
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथे भारत गॅस प्रमाणे एच पी गॅस कनेक्शन आहेत मात्र धनश्री गॅस भुसावळ येथून भारत गॅस सिलिंडर घेऊन आठवड्यात किमान दोन ते तीन दिवस सिलेंडर घेऊन वाहन येते परंतु भुसावळ येथील अनिश गॅस जामनेर रोड येथून पहिल्यांदा सिलेंडर घेऊन वाहन येऊन घरपोच सेवा दिली जात होती मात्र आता काही महिन्यांपासून सुनसगाव येथे एच पी गॅस सिलिंडर घरपोच मिळत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असून घरपोच सिलेंडर सेवा न मिळाल्यास भारत गॅस कंपनीशी संलग्न होणार असल्याची चर्चा सुनसगाव येथे सुरू आहे.

