यावल तालुक्यातील अकलूदजवळ तापी नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली
जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी अंत; हुडको परिसरातील रहिवासी असल्याची माहिती
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१९
यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ तापी नदीपात्रात आढळून आलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. सदर मृतदेह जळगाव शहरातील हुडको परिसरातील एका तरुणाचा असल्याची माहिती समोर आली आहे.
तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविल्याने या प्रकरणातील महत्त्वाचा तपासाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे जळगाव शहरातील हुडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी संबंधित पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

