Wednesday, August 19, 2026
Homeगुन्हासातपुडा जंगलात अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने झाडे तोडणाऱ्या 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

सातपुडा जंगलात अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने झाडे तोडणाऱ्या 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

सातपुडा जंगलात अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने झाडे तोडणाऱ्या 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

आरोपींना 2 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि.19
सातपुडा जंगलात नागादेवी कक्ष क्रमांक 141 मध्ये रात्रीच्या वेळेस अज्ञात इसमांनी अतिक्रमण करण्यासाठी झाडे तोडलेली आढळून आल्याने यावल पश्चिम वनक्षेत्रपाल यांनी चौकशी/ तपास करीत 3 संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता तीनही आरोपींना 2 सप्टेंबर 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.30 जुलै 2026 रोजी नियतक्षेत्र नागादेवी कक्ष क्रमांक 141 यात हरिपुरा राऊंड स्टाफ सह गस्त करत असताना ठिकठिकाणी व जागोजागी रात्री अपरात्री अज्ञात इसम एकत्र येऊन नव्याने अतिक्रमणाचा उद्देशाने झाडे तोडलेली दिसून आले सदरील झाडे खुंटांवर जप्त शिक्का मारून लाल रंगाने 24 ते 85 क्र दिले खुटाचे मोजमाप घेतले.1.693 घ.मी.नु.कि.
21119=00` रुपये  इतके आले
सदरील प्र.रि.क्र 03/2026 मधील आरोपींचा शोध घेतला असता.बुधवार दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी स.11.00 वाजता अटक करण्यात आली आरोपी नामे .क्र. (1) उकार महान बारेला वय – 43 रा.नागादेवी सावखेडासिम  ता.यावल जि. जळगाव ( 2 ) जगन जया
बारेला वय-34 रा. नागादेवी सावखेडा सिम (3) चेलारसिंग मोहन बारेला वय 44 रा.नागादेवी सावखेडासिम तालुका यावल जिल्हा जळगाव आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले आसता भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) अ,ड व फ,अन्वये त्यास न्यायालयीन कोठडी 2 सप्टेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली.
सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक
सौरीश सहाय साहेब.यावल वन विभाग जळगाव,सहा.वन संरक्षक समाधान पाटील साहेब . यावल,वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.सदर कार्यवाहीत संजय बी. इंडे वनपाल हरिपुरा,दिपक परदेशी वनपाल जामन्या.सुधीर पटणे,
श्रीमती सीमा भालेराव,श्रीमती सरला भोंगरे,चेतन शेलार,योगेश मुंढे,रणधीर काटे व सर्व वनसेवक यांनी कार्यवाही केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या