जळगावमध्ये श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात तीन दिवसीय रामनाम महोत्सव व संक्षिप्त भागवत सप्ताह
जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी श्रावण मासाचे औचित्य साधून रविंद्र नगर, मोहाडी रोड, जळगाव येथील श्री सर्वेश्वर महादेव मंदिर परिसरात साडेतीन दिवसीय रामनाम महोत्सव व संक्षिप्त श्रीमद् भागवत निरूपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील ज्ञात-अज्ञात पितृदोष, वास्तुदोष तसेच प्रतिकूल ग्रहदशा आदींच्या निवारणाच्या भावनेतून आणि धार्मिक संस्कार, नामस्मरण व धर्मजागृतीचा संदेश देण्यासाठी या आध्यात्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात सात सत्रांमध्ये संक्षिप्त श्रीमद् भागवत निरूपण करण्यात येणार असून, भाविकांना रामनाम, भागवत कथा, अध्यात्म व धर्मजागृतीचा लाभ घेता येणार आहे. श्री राया उपासनी निजामपुरकर हे या कार्यक्रमाचे निरूपण करणार आहेत.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
कालावधी : दि. ३, ४, ५ व ६ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी ९.३० ते ११.३० व दुपारी ३ ते ५स्थळ : श्री सर्वेश्वर महादेव मंदिर परिसर, रविंद्र नगर, मोहाडी रोड, जळगाव.या धार्मिक महोत्सवाचे आयोजन श्री सर्वेश्वर महादेव मंदिर समिती व महिला मंडळ, रविंद्र नगर, जळगाव तसेच श्री नित्यानंद संस्थान, निजामपूर, ता. साक्री, जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. श्री नित्यानंद संस्थान हे नामप्रचार, अन्नसंतर्पण, गौ-अनुसंधान आणि धर्मजागृतीच्या कार्यासाठी कार्यरत आहे.
दर सोमवारी महादेवाची आरती व प्रसाद
मंदिर समितीच्या वतीने श्रावण महिन्यात दर सोमवारी सकाळी ८ वाजता श्री महादेवाची आरती व विधिवत पूजा करण्यात येत आहे. पूजेनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील शिवभक्त आणि भाविक मोठ्या संख्येने या धार्मिक उपक्रमात सहभागी होत आहेत.
समारोपाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन
या उपक्रमांना भाविकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन कथा व रामनाम महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्याचे नियोजन मंदिर समिती आणि महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांना आध्यात्मिक कार्यक्रमासोबत महाप्रसादाचा लाभ मिळावा, या उद्देशाने मंडळाच्या महिला भगिनी व समितीचे पदाधिकारी नियोजन करीत आहेत.
रविंद्र नगर सर्वेश्वर महादेव मंदिर कार्यकारणी,महेश पाटील – अध्यक्ष,योगेशपाटील – उपाध्यक्ष, रोहन भावसार – सचिव,विनय नेहेते – सहसचिव,सिद्धांत माळी – खजिनदार,किशोर इंगळे – सदस्य,पंकज बहऱ्हाटे – सदस्य,योगेश पाटील – सदस्य,दीपक तायडे – सदस्य,आदित्य जाधव सदस्य,राहुल ढाके – सदस्य,प्रशांत साळुंखे – सदस्य ,गौरव चौधरी – सदस्य,भागवत सप्ताह महिला कार्यकारणी सदस्य,जयश्री भावसार,देविका माळी,मंगला पाटील,आशा सपकाळे,ज्योत्स्ना बहऱ्हाटे,दिपाली पाटील,मनीषा तायडे,वैशाली पाटील,पूजा किशोर इंगळे,वैशाली भामरे,जयश्री बहऱ्हाटे,छाया सोमाणी,कल्पना तळेले,दिपाली जोशी आदी

