यावल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे स्व.पंतप्रधान राजीव गांधी जयंती आणि धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२०
यावल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारताचे माजी स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण अभियान व फळ वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात घेण्यात आला.
हा कार्यक्रम माजी आमदार शिरीषदादा चौधरी व माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली,तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी शब्बीर शेठ व पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांतभाऊ पाटील, शहराध्यक्ष मो.हकीम शेठ, नगरसेवक करीम मेंबर,उमर कच्छी,समीर मेंबर,अझर मेंबर, मझर मेंबर,निसार मोमीन,पराग सराफ,अताऊल्ला शेठ,रफिक टेलर,शफी भाई,शरीफ भाई, अकील सर,अमोल भिरुड, टेनु सोनार,असलम मेंबर,महिला तालुका अध्यक्ष कल्पना अजय तायडे,गणेश गुरव,फैजपूर येथील युवराज भंगाळे,राजू आस्वार,शरद पाटील,नईम भाई, गिरीश देशमुख,सरफराज पिंजारी,किरण तडवी,सुलोचना तायडे,सुनिल पाटील,यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

