Friday, August 21, 2026
Homeजळगावरावेर येथील शांत, सुस्वभावी व मायाळू पुष्पाबाई चौधरी यांचे दुःखद निधन

रावेर येथील शांत, सुस्वभावी व मायाळू पुष्पाबाई चौधरी यांचे दुःखद निधन

रावेर येथील शांत, सुस्वभावी व मायाळू पुष्पाबाई चौधरी यांचे दुःखद निधन

रावेर   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  येथील विखे चौक परिसरातील पारा गणपती मंदिराजवळील रहिवासी सौ. पुष्पाबाई एकनाथ चौधरी यांचे गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रावेर शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत असून मित्रपरिवार शोकाकुल झाला आहे.

त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी महेश चौधरी , राकेश चौधरी, निलेश चौधरी यांच्या मातोश्री होत. तसेच कैलास काशिनाथ चौधरी यांच्या त्या वहिनी होत.

पुष्पाबाई चौधरी या अत्यंत शांत, सुस्वभावी व मायाळू स्वभावाच्या होत्या. महेशभाऊ चौधरी यांच्या मित्रमंडळींपैकी कोणीही त्यांच्या घरी गेले की त्या सर्वांचे आत्मीयतेने स्वागत करून प्रेमाने आपुलकीची चौकशी करीत असत. त्यामुळे त्यांचा सर्वांशी जिव्हाळ्याचा व आपुलकीचा संबंध होता.

“काकू आज आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही,” अशा भावना मित्रमंडळी व परिचितांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या निधनाने रावेर व परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या