रावेर शहरात देशी कट्टा साहित आरोपी जेरबंद पोलिसंची कामगीरी रावेर – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आज रावेर शहरात पोलिंसानी एका इसम कडून एक देशी बनावटी ( गावठी ) पिस्तूल व दोन जिवंत काडतूस सह एका आरोपी अटक केली आहे . या बाबत पोलिस सूत्रा कडून मिळालेली माहिती अशी की आज रावेर बस स्टँड च्यामागे छोरिया मार्केट जवळ एक इस्म हा त्याचे जवळ शस्त्र बाळगूण संशयीरित्या फिरत आहे . गुन्हे शोध पथकातील पोलिस सदर जागेवर गेले असता एका २५ वर्षीय इसम संशयीतरित्या फिरत आळवून आला. पोलिसांनी त्यांच्या अंगझडती केली असता त्याचे जवळून २५००० रुपये किमती चा लोखंडी धातूचा तपकीरी रंगाचा देशी बनावटी चा कट्टा (पिस्तूल ) अग्नी शस्त्र कंबरेला खोचलेले आळवून आला तसेच १००० रुपये किंमती चे दोन काडतूस मिळाले . पोलीसानी त्याचे नाव विचार ले अस्ता कृष्णा दत्तु पाटील वय २० रा. रोकडा हनूमान मंदिर नगर रावेर असे सांगितले . पोलिसानी आरोपी ला अटक केली आहे . याबाबत पो कॉ . सुकेश तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुरनं . 398 /26 भारतीय हत्यार कायदा कलम 3 सह 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे , अ.पो.अ संदीप गावित , डीवायएस अनिल बडगूजर , पो.नि. संदीप पाटील , सपोनि हरिदास बोचरे , गुन्हे शोध पथकातील समाधान ठाकूर , सुकेश तडवी , श्रीकांत चव्हाण , विकार शेख , प्रमोद पाटील , विशाल पाटील , संभाजी बिजागरे यांनी केले आहे

