Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रमाजलगावात ‘वन डे लूक अँड लर्न’ मेकअप सेमिनार उत्साहात

माजलगावात ‘वन डे लूक अँड लर्न’ मेकअप सेमिनार उत्साहात

माजलगावात ‘वन डे लूक अँड लर्न’ मेकअप सेमिनार उत्साहात
माजलगाव,   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            स्त्री शक्ती ऑर्गनायझर्स व प्रिया ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने माजलगाव येथे ‘वन डे लूक अँड लर्न’ या विशेष मेकअप सेमिनारचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सौभाग्य लॉन्स अँड मंगल कार्यालय, गढी रोड, केशापुरी कॅम्प येथे हा सेमिनार उत्साहात पार पडला.

Oplus_131072

या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद (मुंबई) यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सिनेदिग्दर्शिका किशोरी शहाणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ग्राम महसूल अधिकारी साळशिंगी तसेच मनिषा निलेश गायकवाड यांचीही उपस्थिती होती.
सेमिनारमध्ये मेकअप, ब्रायडल लूक तसेच सौंदर्य क्षेत्रातील विविध आधुनिक तंत्रांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ब्रायडल शो आणि फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले होते. सहभागी कलाकारांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे तसेच रिटर्न गिफ्ट देऊन गौरविण्यात आले.

Oplus_131072

कार्यक्रमाला शीतल गायकवाड यांची विशेष (व्हीव्हीआयपी) उपस्थिती लाभली. त्यांच्या पार्लर अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्रशिक्षणानंतर या विद्यार्थिनींनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होण्याचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशाची दखल घेत आयोजक पायल कांबळे व प्रिया मॅडम यांनी शीतल गायकवाड यांचा विशेष सत्कार केला.

 

Oplus_131072

पायल कांबळे आणि प्रिया मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला माजलगावातील सौंदर्य क्षेत्रातील महिला, ब्युटी प्रोफेशनल्स आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सौंदर्य क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा सेमिनार उपयुक्त ठरल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या